कृपया अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना वाचून त्यांचे पालन करावे.
वंचित बहुजन आघाडीच्या वेबसाईटवर तीन प्रकारचे सदस्यत्व उपलब्ध आहे.
सर्वसाधारण सभासद -
सर्वसाधारण सभासद नोंदणी फी ५०/- (पन्नास रुपये) असून सदस्यत्व कालावधी एक वर्षासाठी वैध असेल. सर्वसाधारण कार्यकर्ते, मतदार, सामान्य जनता यांच्यासाठी सर्वसाधारण सभासदत्व आहे.
क्रियाशील सभासद -
क्रियाशील सभासद नोंदणीची फी ५००/- (पाचशे रुपये) असून सदस्यत्व कालावधी तीन वर्षासाठी वैध असेल. पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासाठी क्रियाशील सदस्यत्व आहे. कुठल्याही प्रकारचे पद घेण्यासाठी क्रियाशील सभासद असणे बंधनकारक आहे.
हितचिंतक सभासद -
हितचिंतक सभासद नोंदणी फी १०,०००/- (दहा हजार रुपये) असून सदस्यत्व कालावधी 5 (पाच) वर्षासाठी वैध असेल. पक्षाचे हितचिंतक, पाठीराखे यांच्यासाठी हितचिंतक सदस्यत्व आहे.
महत्वाची सूचना
वंचित बहुजन आघाडीचे सभासद होण्यासाठी सर्वात आधी भाषा निवडा.
एक अर्ज भरायचा असल्यास 'एकल नोंदणी' हा पर्याय निवडा.
एकापेक्षा अधिक अर्ज भरायचे असल्यास 'अनेक नोंदणी' हा पर्याय निवडा.
सुचकाचा सभासद क्रमांक टाका आणि सेव्ह बटन दाबा. उदा. सुचकाचा सभासद क्रमांक जर
VBA-MAR-MH-19-111-09352 हा असेल तर केवळ शेवटच्या डॅश - चिन्ह नंतरचे 09352 हे आकडे प्रविष्ठ करायचे आहेत. (सूचक - सभासद नोंदणी करून घेणारा व्यक्ती)
त्यानंतर नवीन सदस्य या बटणावर क्लिक करा.
संपूर्ण अर्ज भरा, सभासदत्वचा प्रकार निवडा आणि सेव्ह बटन क्लिक करा.
त्यानंतर दूसरा अर्ज भरण्यासाठी 'नवीन सदस्य' या पर्यायावर क्लिक करा.
सर्व अर्ज भरून झाल्यावर Pay बटणावर क्लिक करा आणि सर्व अर्जाची एकत्रित फी अदा करा.
ज्या सभासदांना सभासदत्वाचे नूतनीकरण करायचे असेल त्यांनी नूतणीकरणाच्या पर्यायावर क्लिक करून आपला आधीचा सभासद क्रमांक टाकावा (केवळ शेवटच्या डॅश - चिन्ह नंतरचे आकडे टाकावेत) आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या सुचनांचे पालन करावे.
एकापेक्षा अधिक सभासदांचे नूतनीकरण करायचे असल्यास अनेक नूतनीकरण या पर्यायावर क्लिक करावे. सुचकाचा आयडी प्रविष्ठ करून सेव्ह करावा आणि नंतर नूतनीकरण करावयाचे असलेले सभासद क्रमांक भरून पुढील सुचनांचे पालन करावे.
(सभासद क्रमांकाचे केवळ शेवटच्या डॅश - चिन्ह नंतरचे आकडे टाकावेत.)
सभासद नोंदणी अथवा सभासद नूतनीकरण करताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास सभासदाचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी आणि नेमकी काय अडचण आहे ते पुढील ईमेल वर पाठवावे - vbamembershipteam@gmail.com